कल्पना करा, आजपासून पुढील पन्नास वर्षातील गोवा
निवडणूक प्रक्रियेतून निवडलेल्या सरकार एवजी ‘लोकशाही’ महामंडळाकडे राज्याचे सर्वाधिकार. एक राज्य जिथल्या लोकसंख्येचे दोन वर्गांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. ओव्हरलॉर्ड्स, एक श्रीमंत, समृद्ध संख्यात्मक अल्पसंख्याक गट, ज्यांना राज्याच्या पृष्ठभागावर अर्थात जमिनीवर राहण्याचा परवानाकृत विशेषाधिकार आहे आणि भूगर्भीय गट जो वंचित, गरीब जनसमूह, भूमिगत गुहांतील वसाहतींमध्ये मेंढरांगत जीवन जगणारा. एक राज्य जिथे विस्तृत जमिनीचे शुशोभीकरण करण्यात आले आहे, जे जागतिक पर्यटनाचे दीपस्तंभ आहे आणि भारतातील सर्वात महाग क्षेत्रफळ असलेले ठिकाण आहे , परंतु ते सगळे इथल्या जंगल संपत्तीचा विनाश करून मिळवलेले वैभव आहे. हवामान बदलामुळे इथला किनारी भाग आधीच विद्रुप होऊ लागला आहे. एक राज्य म्हणून जनता नियुक्त सरकारची जागा संचालक मंडळाने घेतली आहे आणि जेथे व्यावसायिक ब्रँडिंगचा भाग म्हणून गोव्याचे नाव गो-आह असे बदलण्यात आले आहे. एक राज्य जेथील शेवटच्या जिवंत वाघिणीची शिकार केली जाणार आहे आणि तिथल्या जंगली जमिनीचे रूपांतर एका अलिशान व्हिला एन्क्लेवमध्ये करण्याचा विचार आहे.
माझी पहिली कादंबरी, ‘गो-आह-२०७५’, भारतातील पहिली लाईव्ह, द्विभाषिक कादंबरी, जीची मांडणी भविष्यकालीन परिस्थितीचा वेध घेणारी आहे. २०७५ च्या सुमारास हे कथानक पाच मित्रांभोवती फिरते जे आपल्या दुसऱ्या मारल्या गेलेल्या मित्राच्या आणि त्याच्या पत्नीच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आणि न्याय मिळवण्यासाठी जागृतीची मशाल हातात घेऊन वावरत आहेत. गोव्याच्या किनारी भागातील हणजूणमधील आपले शेवटचे पारंपरिक घर विकण्यास नकार दर्शवल्यानेच ही हत्या झाली होती.
मित्राच्या हत्येचा बदला घेण्यात यश मिळाल्याने उत्साही झालेले हे पाच मित्र राज्याच्या विनाशासाठी आणि भूगर्भातील लोकांच्या क्रूर छळासाठी जबाबदार संचालक मंडळाला आपले लक्ष्य बनवतात आणि आपल्या उद्दीष्ठांची व्याप्ती वाढवतात.
मी गोव्यात वास्तव करणारा लेखक आहे. एक पत्रकार या नात्याने माझ्या बायलाईन्स द हिंदुस्तान टाईम्स, तहलका, द असोसिएटेड प्रेस, बीबीसी, द गार्डियन, डेक्कन हेराल्ड, फर्स्टपोस्ट, स्क्रोल, डाउन टू अर्थ आणि गोव्यातील अनेक वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाल्या आहेत. माया, एमबी, भूषण आणि माया बी, असाही माझा अनेकदा उल्लेख होतो.
माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांचे चरित्र सहलेखन अनेक समीक्षकांनी गौरविले आहे आणि नॉन फिक्शनचे आणखी एक काम सध्या प्रकाशित होण्याच्या प्रक्रियेत आहे.
मी गोवा, दिल्ली आणि मुंबई येथे काम केले आहे आणि पेनप्रिक्स नावाचा एक लोकप्रिय मीडिया समालोचक ब्लॉग देखील लिहिला आहे, ज्याने माजी नाझी कर्नल आणि WW2 एकाग्रता शिबिराचा प्रभारी 'योहान बाख' बद्दल माझी सर्वात हास्यास्पद कुप्रसिद्ध प्रँक होस्ट केली आहे. प्राचीन पियानो विकण्याचा प्रयत्न केल्यावर त्याला एका जर्मन एजन्सीने गोव्यात ‘अटक’ केली होती. तुम्ही कदाचित कादंबरी वाचक नसाल पण , किमान ही कथा पहा.